या ५ सोप्या गोष्टी ज्या तुमचे जीवन बदलतील | 5 Simple Ways to Increase Your Value
आपल्याला सगळ्यांनी किंमत द्यावी असे वाटत असते. आपलं व्यक्तिमत्व असं असावं की जे इतरांना प्रेरणा देऊ शकेल. प्रवृत्त करु शकेल तर आपल्यासाठी आवश्यक आहे की लोकांच्या मनात आदर असणं. तुम्हाला तर माहितच असेल की आदर मागून मिळत नाही तर तो मिळवावा लागतो आणि आदर मिळवण्यासाठी गरजेचा असतो तो आत्मविश्वास व स्वत:त बदल करणं तर आज आपण अशा पाच गोष्टी पाहुया की ज्याचे अनुकरण केल्याने तुमची किंमत वाढेल आणि तुम्ही कोणत्याही वयाचे असलात तरी इतरांना तुमचे अनुकरण करावेसे वाटेल. तुम्हाला असा अनुभव येईल की लोक तुमचे अनुकरण करतायत. तुमची कदर करतायत. लोक तुम्हाला तुमचा सल्ला विचारतायत. हे जाणुन घ्यावसं वाटत असेल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा !
पहिली गोष्ट –
आपल्या आजुबाजुस अशी काही माणसं असतात जी फक्त बोलतात किंवा फेकतात मात्र करत काहीच नाहीत म्हणजे मी अमकं केलं. मी तमकं केलं. मी अमुक करणार आहे. मी भविष्यात अशी आखणी केली आहे अशा सगळ्या गोष्टी ते सांगतात पण करत मात्र काहीच नाहीत आणि ज्यावेळी कृती करायची वेळ येत तेव्हा काहीही करत नाहीत. असं आपण ज्यावेळी करतो तेव्हा इतरांच्या नजरेत आपली किंमत कमी होते आणि लोकांना कळतं की ही व्यक्ती फक्त बोलते करत काहीच नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण आपल्या शब्दांची किंमत करु त्यावेळीच माणसं आपल्या शब्दांची किंमत करतील. कुठल्याही गोष्टीची सुरवात करताना थोडं थांबा! विचार करा! स्वत:च्या मनाला विचारा की ही गोष्ट मी करु शकेन ना? याला मी न्याय देईन ना? आणि तरच ती गोष्ट तुम्ही इतरांना सांगा. आपल्या वचनाशी पक्के राहा. मग ती गोष्ट इतरांबाबतीत असेल. आपल्याबाबतीत असेल किंवा ती गोष्ट कोणतीही असू दे. आपण आपल्या शब्दांशी पक्कं राहायला हवं. आपण दिलेला शब्द पाळायला हवा, ह्याने आपल्याला जाणीव होईल की आपली किंमत दिवसेंदिवस वाढत चाललेय.
दुसरी गोष्ट –
फार महत्वाची आहे की सदैव यशस्वी व्यक्तींबरोबर राहणे. जर तुम्ही अशा वर्तुळात आहात. इतरांपेक्षा जास्त हुशार आहात किंवा तुमच्याकडे इतरांपेक्षा अधिक ज्ञान आहे तर तुम्ही चुकीच्या वर्तुळात आहात आणि तुम्ही तुमच्या सीमा कधीही ओलांडु शकणार नाही यासाठीच कायम यशस्वी लोकांबरोबर राहणं हे चांगलंच असतं. आपल्यापेक्षा ज्यांना जास्त ज्ञान असतं त्यांच्यामुळे आपल्या झानात वाढ होऊ शकेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्या कंपूत तुमच्यापेक्षा जास्त उत्साही, जास्त ज्ञानी, तुमच्यापेक्षा जास्त प्रेरणादायी माणसं असतील तर त्यांच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावरही होईल व तुमचीसुध्दा किंमत दिवसेंदिवस वाढेल.
तिसरी गोष्ट –
जी फार आवश्यक आहे ती म्हणजे नेहमी काही ना काही नवनवीन शिकत राहा. नवी कौशल्ये आत्मसात करा. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल वा गृहिणी असाल. तरीही नवे काही शिकण्याचा प्रयत्न करत राहा, तुमच्यात जे कौशल्य आहे त्याला अद्ययावत करा. जेव्हा आपण नवे काही शिकतो तेव्हा आपण आपल्या कल्पकतेला बाहेर काढतो व इतरांनाही जाणीव होते की ही व्यक्ती सदैव काही ना काही नवे शिकत असते. काही ज्ञान घेत असते त्यामुळे, त्यांच्या नजरेत आपली किंमत वाढते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण काही नवे शिकतो तेव्हा आपण ते ज्ञान घेत असतो आणि या जगात असं ज्ञान आहे तेव्हा समाज त्याची दखल नक्कीच घेतो.
चौथी गोष्ट –
आयुष्यात ध्येय निश्चित करा. ध्येय प्राप्त कसं करता येईल याचा विचार करा त्यासाठी तुम्ही काय करु शकता! तर असं ध्येय निश्चित करा की जे प्राप्त केलं जाऊ शकतं. असं ध्येय मुळीच नको ज्याबद्द्ल तुम्ही स्वत: साशंक आहात की हे माझ्याच्याने होईल की नाही! ज्यावेळी एकाबाजुस नवे ध्येय निश्चित करता आणि ते साध्य करण्यासाठी त्यामागे लागता त्याचवेळी एक गोष्ट घडत असते की तुमची शक्ती निर्माण करण्याचं ध्येय आणि लक्ष केंद्रीत करण्याचं कौशल्यं वाढत जाते आणि ह्या दोन गोष्टी ज्याकडे असतात त्याच्यावर माणसं इतरांपेक्षा जास्त विश्वास ठेवतात. आणि लोकांमध्ये त्याची किंमत वाढत जाते.
पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट –
की स्वत:ची काळजी घ्या. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसं चांगलं राहील याचा कायम विचार करा ज्याचे शारिरीक किंवा मानसिक आरोग्य चांगलं असतं त्याचा आत्मविश्वास हा कायम वाढत असतो. तुम्ही पाहिलंच असेल तुमच्या कंपूतील एखादी व्यक्ती व्यायामशाळेत जाते, ध्यानधारणा करते, योगासनं करते, तर आपल्या मनात त्याच्याबाबतीत किंमत ही जरा जास्त असते. आपण जेव्हा आरोग्याचा विचार करतो तेव्हा शारिरीक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तेवढेच महत्वाचे आहे. हे कशानं होईल ! तर हे ध्यानधारणेमुळे होईल. जगातले ९९ टक्के लोक हे ध्यानधारणेचा विचार करतात. फक्त १ टक्का माणसं ध्यानधारणा करतात. जर तुम्ही रोज ध्यान केलं तर तुम्हीही या १ टक्का लोकांमध्ये समाविष्ट व्हाल ज्यांचे मानसिक आरोग्य खुपच चांगले, छान आहे. ज्यांचे मानसिक आरोग्य चांगले तो मनुष्य आत्मविश्वासू असतो आणि त्याचीच किंमत समाजात मोठ्या प्रमाणात असते म्हणूनच आपले शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करा. रोज ध्यान करा. या पाच गोष्टींचा जर तुम्ही रोजच्या व्यवहारात अवलंब केलात तर जग तुमचेच आहे.
धन्यवाद ….